शाळेत असताना ‘झुळूक‘ नावाची एक कविता पाठ्यपुस्तकात होती . “वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे … “ अशी सुरु होऊन “ स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा“ अशी ती संपते. शाळेत शिक्ल्यापासून ती माझी आवडती कविता आहे. त्यातल्या ‘स्वैर, स्वछंद या शब्दां व र तेव्हाही काहीतरी विचार केलेला आठवतो. फार भावली होती ती कल्पना तेव्हा…पण गंमतअशी कि त्या शब्दांचा नेमका अर्थ एवढ्या वर्षांनंतर सुद्धा मी अजून शोधतेय! राग येतो कधीकधी… आपल्याला आवडणाऱ्या, भावणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करण्यापूर्वी एवढा विचार का करावा लागतो? कृतीचं एक ठीक आहे, पण विचार सुद्धा? त्यांची सुद्धा एवढी परीक्षा? चूक विचार आणि बरोबर विचार, दिशाहीन विचार आणि योग्य दिशेने जाणारे (?) विचार, समंजस, प्रगल्भ विचार व असमंजस, बालिश विचार …साले एवढे judgements? ठीक आहे, तेही परवडले एक वेळ पण भावना सुद्धा? त्याही चूक किंवा बरोबर या चौकटीत बसवता येतात? एवढी अशक्य गोष्ट किती सहज करतात लोक… खरच विचार करून पहा . अमुक एका वेळी, अमुक तऱ्हेच्या प्रसंगी, अमुक प्रकार...