प्रश्न
शाळेत असताना ‘झुळूक‘ नावाची एक कविता पाठ्यपुस्तकात होती .
“वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे … “ अशी सुरु होऊन “ स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा“ अशी ती संपते.
शाळेत शिक्ल्यापासून ती माझी आवडती कविता आहे. त्यातल्या ‘स्वैर, स्वछंद या शब्दां व र तेव्हाही काहीतरी विचार केलेला आठवतो. फार भावली होती ती कल्पना तेव्हा…पण गंमतअशी कि त्या शब्दांचा नेमका अर्थ एवढ्या वर्षांनंतर सुद्धा मी अजून शोधतेय! राग येतो कधीकधी… आपल्याला आवडणाऱ्या, भावणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करण्यापूर्वी एवढा विचार का करावा लागतो? कृतीचं एक ठीक आहे, पण विचार सुद्धा? त्यांची सुद्धा एवढी परीक्षा? चूक विचार आणि बरोबर विचार, दिशाहीन विचार आणि योग्य दिशेने जाणारे (?) विचार, समंजस, प्रगल्भ विचार व असमंजस, बालिश विचार …साले एवढे judgements?
ठीक आहे, तेही परवडले एक वेळ पण भावना सुद्धा? त्याही चूक किंवा बरोबर या चौकटीत बसवता येतात? एवढी अशक्य गोष्ट किती सहज करतात लोक…
खरच विचार करून पहा . अमुक एका वेळी, अमुक तऱ्हेच्या प्रसंगी, अमुक प्रकारची भावना आपल्या मनात आली पाहिजे.. / अमुक‘च‘ प्रकारची भावना आली पाहिजे, किंवा अमुक प्रकारची भावना आली‘च‘ पाहिजे. नाही आली तर आपण थोडेसे गैर , किती विचित्र वगैरे असल्यासारखं वाटून दिलं जातं . समाज, समाजातील वागणूक, सामाजिक शिस्त वगैरे गोष्टींचा एवढा narrow अर्थ आहे का?
उन्मुक्त , स्वतंत्र, स्वैर, स्वच्छंदी हे फक्त कवितेतले शब्द राहिलेत का? कुणी स्पष्ट व प्रामाणिकपणे आपल्या भावना (वर म्हत्ल्य्प्रमाणे विचित्र, गैर वगैरे प्रकारात मोडणाऱ्या) मांडाव्या म्हटलं तर ते सहज शक्य का होत नाही? जर मांडल्याच कुणी, तर त्यांना मान्यता का मिळत नाही? आपली गाडी तर इथे विचार मानण्यावर अड्लीय, कुणी असा वागण्याचा प्रयत्न केला तर? तर काय, त्या माणसाच्या नावाला ‘स्वैराचारी‘ वगैरेच विशेषणे लागतील, नाही?
आपली समृद्ध संस्कृती, प्रचंड साहित्य विश्व , अनेक विचारवंत, तत्वज्ञान, या साऱ्याचा अंत हाचका? समाजाच्याmajor भागाचा असा संकुचित दृष्टीकोन? संकुचित वागणे, तेच पुढे चालवणं , तेच glorify करणं ? एकूणच संकुचितजीवन जगणं? का?
आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत का?
बाप रे.....गीता, मला माहित नव्हतं तुला पण इतके प्रश्न पडतात....आणि ते पण सगळे why / why not category मधले...चं वाटला ब्लॉग वाचून...कोणी तरी माझ्यासारखेच प्रश्न घेऊन आयुष्याची उकल करायला बसलाय हे पाहून ह्या विश्वातला एकटेपणा दूर गेला...आभार असं काही मोकळेपणाने लिहिल्याबद्दल आणि शुभेछा तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर कधीतरी मिळोत...
ReplyDelete