Posts

Showing posts from July, 2016

confluence

अंगावर काळ्या कभीन्न मखमलीची शाल पांघरुन रात्र धीम्या गतीने सरकत होती. बोचर् या थंडीची मजा घेत ती गेस्ट हाउसच्या मागे पायरीवर येवून बसली. आजूबाजूला तो चिमुकला गाव शांत झोपला होता. काळ्या मखमली रात्रीवर चंदेरी कुसर काढत चंद्र दूर ढगांच्या आड खेळत होता. दिवसभराचा प्रवास, स्वर्गीय निसर्गात सोबतीने मिळवलेले क्षण, सगळ्या आठवणींनी सुद्धा एक प्रकारची मंद धुंदी चढल्यासारखी झाली. पण याहून जास्त धुंदी चढवत होता तो जवळच वाहणार्या ओढ्याचा गाज. पाणी काही दिसत नव्हतं, पण त्या काळ्या शांततेत जीव ओतत आपल्याच धुंदीत तो खळाळत चालला होता. तिच धुंदी वाटून टाकत. समोर दिसणार्या हिमरांगा जणू  हिर् यांची बरसात झाल्यासारख्या चमचमत होत्या. त्या चंदेरी महालात अनोख्या मधुर तालावर तिचं मन उडत होतं. मागून हलकेच खांद्यांवर येवून विसावलेले दोन्ही हात तिने हळूच हातात घेतले. किंचीत भरू आलेले डोळे मिटून मागच्या मागे डोकं टाकत बिनधास्त ती त्याच्यावर विसावली. ओढ्याच्या गाजात अजून एक लय अलगद मिसळली. त्याच्या काळजाची धडधड. तशीच. बेधुंद.                                       ****** Apparently this part of the world