Posts

Showing posts from December, 2014

जादूचं घर

Image
माझ्या घरात कौलारू छपरातून एक तिरीप यायची . जमिनीवर निट   वर्तुळ काढणारी . आणि तिच्यात असंख्य रंगीबेरंगी पऱ्या रहायाच्या . घराला माळा   होता.   त्यावर जुनी पुस्तकं , नारळ , भांडी , ट्रंका असं   काहिही   शोधताना खजिन्याचा मालक असल्या सारखं   वाटायचं . लपाछपी च्या खेळात सतत जिंकवण्या साठी असंख्य जागा अपोआप   तयार व्हायच्या . फटाक्यांची   पिशवी   अडकवायला   फक्त   ताई चाच   हात   पोचेल असा मोठा खिळा   होता . चौकात   आंधळी   कोशिंबीर    कितीही   मुलं   खेळू   शकतील   एवढी जागा   होती . पडवी   वरच्या सोप्या सारखा सुबक   सोपा मी कुठेही   बघितला नाही आणि पडवी वरच्या रांगोळी सारखी   रांगोळी   कधीही   कुठेच   सजली   नाही . घरात खूप कोनाडे होते . त्यातले बहुतेक सगळेच गूढ दिसायचे . काहीतरी   लपवून   ठेवल्यासारखे . फुलं , उदबत्ती   आणि चुलीतल्या   जाळ णा चा एकत्र   गूढ वास यायचा . पावसात   कौलांवर   मैफिल   वाजायची . पाऊस   इतर   सर्वां सारखाच   आपुलकीने   घरात हि   यायचा . त्या घरात   काहीतरी   जादू   होती . जादूचं   ते

far...

When it rains No distance is far. I breath in the fragrant earth... And you Have turned into the Wind Carrying it across the mighty sky.