जादूचं घर

माझ्या घरात कौलारू छपरातून एक तिरीप यायची. जमिनीवर निट  वर्तुळ काढणारी. आणि तिच्यात असंख्य रंगीबेरंगी पऱ्या रहायाच्या. घराला माळा  होता.  त्यावर जुनी पुस्तकं , नारळ , भांडी, ट्रंका असं  काहिही  शोधताना खजिन्याचा मालक असल्या सारखं  वाटायचं . लपाछपी च्या खेळात सतत जिंकवण्या साठी असंख्य जागा अपोआप  तयार व्हायच्या . फटाक्यांची  पिशवी  अडकवायला  फक्त  ताई चाच  हात  पोचेल असा मोठा खिळा  होता . चौकात  आंधळी  कोशिंबीर   कितीही  मुलं  खेळू  शकतील  एवढी जागा  होती. पडवी  वरच्या सोप्या सारखा सुबक  सोपा मी कुठेही  बघितला नाही आणि पडवी वरच्या रांगोळी सारखी  रांगोळी  कधीही  कुठेच  सजली  नाही . घरात खूप कोनाडे होते. त्यातले बहुतेक सगळेच गूढ दिसायचे . काहीतरी  लपवून  ठेवल्यासारखे . फुलं , उदबत्ती  आणि चुलीतल्या  जाळ णा चा एकत्र  गूढ वास यायचा . पावसात  कौलांवर  मैफिल  वाजायची . पाऊस  इतर  सर्वां सारखाच  आपुलकीने  घरात हि  यायचा . त्या घरात  काहीतरी  जादू  होती . जादूचं  ते घर  एवढ्या  सहज  कसं  काय  पडलं  काय  माहित .


पण त्या बरोबर जगातली  सर्वात  सुंदर  पडवी , सर्वात  मायाळू  भिंत , विचित्र  गुढ  कोनाडे , ओल्या  मातीचा  वर्ष भर  येणारा वास, पऱ्यांची  तिरीप, खजिना , सगळंच  गेलं . आता  पऱ्या चं  घर फक्त स्वप्नात . आणि सारवलेल्या  मातीचा आणि ओल्या भिंतीचा  वासआठवणीत . फक्त




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Kargil war memorial : an experience

Of Charms and Chinars

RESOLUTION