Posts

Showing posts from April, 2013

हसतो

This is a poem by Sandeep Khare. This one is pretty old and not a very known one... But i simply love it! for its simplicity, for its honesty, for the clear and sharp way in which the words just... TOUCH!!! हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही हसतो कारण तुच कधी होतीस  म्हणालीयाहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड तितके काही गाल पसरणे अवघड नाही हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे हसतो कारण सत्याची मज भिती नाही हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....