सुखाश्रू

हि डॉक्टर भूषण केळकर यांची कविता आहे. कोणत्या पुस्तकात वाचली होती ते आठवत नाही आत्ता.. पण आवडली होती, म्हणून लिहून ठेवलीय. valentine day च्या निमित्ताने जे वातावरण बनत चाललंय, पेपर मधल्या भडक आणि अवास्तव महागड्या जाहिराती, सहज फिरताना कानावरून गेलेले काही संवाद, (तेही 'आश्चर्यकारक' या प्रकारात मोडणारे) आणि एकूणच मला  जी 'विचित्र' वाटते अशी पण जवळपास सर्वांनी मान्य केलेली प्रेम या भावनेची व्याख्या..... या अशा पार्श्वभूमीवर हि कविता share करावीशी वाटली.

मला खूप आवडलेली कविता आहे. आणि काही बोलणं जरुरी वाटत नाही. The poem speaks for itself.
                                        
         सुखाश्रू 
                                                       डॉ. भूषण केळकर 


पहाटेची सूर्योदयाची वेळ नितांत सुंदर, रमणीय शांत!
भरतीच्या शेवटच्या अस्पष्टश लाटेला 
अनुरक्त उषा राणीने विचारल
"अजून सूर्याचे भालदार चोपदार जेमतेम येताहेत आणि तू आत्ताच तृप्त कशी,
पुळणीवर फुललेल अस्पष्टसे स्मित आणि तृप्तीचा एक सुखाश्रू गालावर?"

लाट उषा देवीला काय म्हणाली सांगू?
ती म्हणाली,

"हा सूर्य तेजस्वी आहे खरा पण माझी तृप्ती आहे ती मावळतीच्या पूर्ण चंद्राची 
माझ्या पाण्याचं कण हि शोषण न करता 
फक्त मायेचं चांदण शिंपडून गेला 
रात्रभर भीती वाटत असताना 
नुसत्या अस्तित्वाने हलकेच थोपवून गेला ....

तुला जो सुखाश्रू दिसला ना, 
तो अश्रू त्याचा होता, आणि जाता जाता..
फक्त माझ्या गालावर ओघळला होता!


Comments

Popular posts from this blog

Please send help

The cup story

रातराणी