Naadaan Parinde....


आळस, कंटाळा, आणि त्याही पेक्षा मोठ्ठा “काय लिहू”? हा प्रश्न यामुळे बऱ्याच दिवसांनी ब्लॉग उघडला. आज खूप दिवसांनी काहीतरी लिहावसं वाटतंय.....

मधल्या काळात खूप सिनेमे पाहिले . कित्येक आवडलेल्या फिल्म्स बद्धल पण लिहायचं...

ROCKSTAR पहिला. ठीक वाटला , पण रेहमान ने नुसतं ‘येयेयॅ’ केलं तरी कसं काय एवढं छान music  तयार होतं याचं आश्चर्य वाटतं. तो माणूस म्हणजे जादू आहे! 

‘नादान परिंदे’ तर superb! त्यातल्या शेवटच्या ओळी ज्याने कुणी लिहिल्या , त्या माणसाला मला भेटायचय... एकदा तरी भेटायचंय! I belive now that no man can ever combine such intense grief with hopefulness like he has... आणि तेही शब्दात व्यक्त करणं म्हणजे... ग्रेटच!

एवढ्या intense भावना अश्या सहजपणे जर मी व्यक्त करू शकले असते तर.... 

माझ्यासाठी हे अशक्यच आहे. म्हणून काहीही आणि कोणत्याही माध्यमातून कसंहि “व्यक्त” करु  शकणाऱ्या माणसाबद्धल मला आदर वाटतो. प्रेम, आश्चर्य, कौतुक असंही बरच काही वाटतं. तेही “अव्यक्त”च,  almost always.......!

                            **************


परवा पाऊस पडला चक्क! पाऊस सुद्धा जादू आहे...Rain falls, and I fall for it.....every bloody time!

“जेव्हा माझे शब्द संपतात, तेव्हा पाऊस सुरु होतो,
अर्धवट माझं गाणं पूर्ण करून गातो..” 

असं काहीतरी मी २-३ वर्षापूर्वी लिहिलं होतं ते एकदम आठवलं मला. आणि पुन्हा एकदा माझ्या बाबतीत हे खूप खरं आहे असं वाटलं. नाहीतर कशाला यायला बसलाय पाऊस नोव्हेंबर महिन्यात....

अव्यक्त भावना, पूर्ण गाणं वगैरे ठीक आहे.... पण ते गाणं कुणापर्यंत पोहोचतं आणि कोण ऐकत तरी का, हा प्रश्न आहे! :)

पाऊस celebrate करणारे लोक ऐकत असतीलही कदाचित...!

                     pic: @ vipul rege

Comments

Popular posts from this blog

Kargil war memorial : an experience

Of Charms and Chinars

RESOLUTION