अनंत चतुर्दशी च्या निम्मित्ताने
४ वर्षां नंतर आज अश्या आठवणी का येताहेत काय माहीत! २००८ च्या अनंत चतुर्दशीला मी पुण्यातील गणपती ची विसर्जन मिरवणूक पाहिली होती. आयुष्यात पहिल्यांदा! संपूर्ण ! आणि अगदी २ हाताच्या अंतरावरून! चाणक्य मंडल परिवाराची एक विद्यार्थिनी म्हणून सदस्य असताना दर वर्षी प्रमाणे ७ दिवस गणेशोत्सवात volunteer म्हणून काम केलं होतं. ते ७ दिवस आणि विसर्जनाचा पूर्ण दिवस आमच्या टीम मधल्या unique pieces मुळे शक्य झालं. आमचा ग्रुप होता group 7. पण कुणी विचारल कि सगळे मुद्धाम “007” अस सांगायचो. तेव्हा “इंडिअन बोंड” नावाची ringtone सगळ्यांनी आपापल्या फोन वर सेट करून ठेवली होती. टीम मधला कुणी समोरून येताना दिसला कि background music दिल्यासारख ते music म्हणायचं. ७ दिवस जगातल्या सगळ्या प्रकारच्या PJ चा स्टोक उघडला होता. आणि काहीही बडबड करून कारणाशिवाय वेड्यासारखे हसायचो. PJ म्हणजे poor, pathetic, pachka, आणि जे काही होत असेल तसले जोक्स झाले होते. दुसऱ्या टीम मधले मुलं मुली आमच्या टीम मध्ये मुद्दा...