"वास पुराण"


दर सोमवारी वाळपई ते पणजी असा दोन तासांचा बस प्रवास होतो. हा प्रवास म्हणजे a complete assault on senses असतो. त्यातल्या त्यात नाकावर जास्त! for those who are ‘blessed’ with a sharp sense of smell, the journey is enough to turn it into a curse. घरूनच सुरुवात होते. सकाळी ६:३० – ६:४५ च्या दरम्यान निघाल्यामुळे स्वच्छ ताजा श्वास आणि भोवतीच्या झाडांमुळे मोकळा वास पुढच्या आठवड्या साठी साठवून मी बस साठी उभी राहते. बस मध्ये चढतानाच पहिला हमला होतो- गंजलेल्या स्टीलचा वास... आणि त्या handle ला धरून चढण्या शिवाय पर्याय नसल्यामुळे तो वास पुढे २ तास हाताला चिकटून राहतो! आत शिरल्यावर बस मधल्या अगरबत्ती चा वास! (बस मध्ये अगरबत्ती लावायची प्रथा ज्याने कुणी सुरु केली असेल त्याला देव माझ्या शापा पासून वाचवो) खेडेगावातील शाळेत जाणारी मुलं खच्चून भरलेली असल्यामुळे त्यांनी डोक्याला  लावलेल्या तेलाचा वास. त्यात सुद्धा खोबरेल चा वेगळा आणि कुठल्या तरी ‘सुगंधी’ तेलाचा – पण दोन्ही स्वतः पुरते prominent! आणि सोमवार असल्यामुळे ‘स्वच्छ ‘ धुतलेल्या uniform ला येणारा detergent चा वास...

असे वार (कि वास?) झेलत बस शाळेजवळ पोहोचते. तिथे शाळेतली मुलं उतरून हमल्यासाठी  दुसरी फौज आत शिरते .... office goers, college crowd आणि वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करणाऱ्या बायका आणि त्याची मुलं. मग ऑफिसमध्ये जाणारे लोक वाचत असलेल्या ताज्या newspaper चा वास. क्वचित एखाद्या perfume चा वास. थोड पुढे गेल्यावर कॉलेज ला जाणारं यंगीस्तान चढल्यावर काय विचारता... किमान ५-६ वेगवेगळ्या perfumes आणि  deoderent चे वास. मुलींनी लावलेल्या cosmetics चे वास. shampoo चे वास. बायकांच्या डोक्याच्या त्तेलाचे वास. त्यांनी माळलेल्या वेगवेगळ्या फुलांचे आणि गजर्यांचे वेगवेगळे वास. मुलं असतील तर त्यांच्या powder चा वास. क्वचित कधीतरी tiffin मधल्या पदार्थांचा दरवळणारा वास. कुणी पिशवीत मासे घेऊन चढलं तर त्याचा वासच वास! त्यात दिवस खुपच वाईट असला तर पाउस पडतो. मग खिडक्या बंद आणि वर सांगितलेले सगळे ‘एकत्रित’ वास! 

खिडक्या उघड्या असतील आणि सुदैवाने खिडकीजवळची जागा मिळाली असेल तर काही गावांचा पण peculiar  वास जाणवतो. धुराचा वास, mining trucks चा वास... तो शब्दात नाही सांगता येत. 

हे सगळं सहन करत रायबंदर हून पाटो पुलावर किंवा पर्वरी हून मांडवी पुलावर आल्या आल्या लगेच नाकात भरणारा खारट समुद्राचा वास! पूर्वी हा वास खरंच डोक्यात जायचा. पण आता ह्या वासाशी एवढ नातं जुळलंय कि खारट दमट humid गरम वारा आला कि एक प्रकारचं homecoming feeling जाणवतं. त्या वाऱ्यात मला माशांचा पण वास येतो. (असं मला वाटतं. तुम्हाला आलाय का कधी?) 

मग ऑफिस मध्ये पोचल्यावर weekend नंतरच्या AC चा वास. तो जाणवू नये म्हणून फवारलेल्या room freshner चा वास. आणि मी थेट खिडकी उघडून घेतलेला मोकळ्या हवेचा वास! परवा ऑफिस च्या मागे माझ्या खिडकी समोर एक सोनचाफा वेड्यासारखा फुलला होता. ‘बहर” शब्दाचा अर्थ मला त्याला बघून कळला. त्या चाफ्याचा मंद सुवास वाऱ्याबरोबर येत होता. तो मात्र शब्दांच्या पलीकडला आहे. 

तर असे वेगवेगळे वार सहन करत नाक दुपारपर्यंत neutral  होऊन जातं. वास जाणवणं कमी होतं... फक्त पुढच्या सोमवारपर्यंत! 


Comments

  1. Apratim... blog vachat astana he sagle vaas me pratyakshyat anubhavat hoto.. keep it up..

    ReplyDelete
  2. thank u shivendra :) pratikriyesathi dhanyavaad!

    ReplyDelete
  3. तुझ्या श्वसन शक्तीला विनम्र अभिवादन... :) :) :)
    मला हा ब्लॉग मी स्वतः कालेजात शिकत असताना घरापासून शिवाजीनगर असं बस् ने केलेल्या प्रवासाबद्दल लिहिलेला लेख आठवतोय. वेल, खूप दिवस होऊन गेले मी असं काही लिहून..सो असं काहीतरी चटपटीत लिहून सगळे वास "विजुअलीझ" करायला लावल्याबद्दल आभारी आहे.
    (जाता जाता ह्या प्राण्याचा ब्लॉग सुद्धा कधी तरी डोकाऊन जावा माणसांनी)
    (and i have no idea why google transliteration is ******-up)

    ReplyDelete
    Replies
    1. arre... dokavat aste mi adhun madhun! "विजुअलीझ"...haaha!!! pan thanx. (ajun ek thank u ani acknowledgement mazya shvasan shakti kadun :) )

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Kargil war memorial : an experience

Of Charms and Chinars

RESOLUTION