Posts

Showing posts from February, 2011

प्रश्न

शाळेत असताना ‘झुळूक‘ नावाची एक कविता पाठ्यपुस्तकात होती . “वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे … “ अशी सुरु होऊन “ स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया  विसावा यावे मी तिन्हीसांजा“  अशी ती संपते. शाळेत शिक्ल्यापासून ती माझी आवडती कविता आहे. त्यातल्या ‘स्वैर, स्वछंद या शब्दां व र तेव्हाही काहीतरी विचार केलेला आठवतो. फार भावली होती ती कल्पना तेव्हा…पण गंमतअशी कि त्या शब्दांचा नेमका अर्थ एवढ्या वर्षांनंतर सुद्धा मी अजून शोधतेय! राग येतो कधीकधी… आपल्याला आवडणाऱ्या, भावणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करण्यापूर्वी एवढा विचार का करावा लागतो? कृतीचं एक ठीक आहे, पण विचार सुद्धा? त्यांची  सुद्धा एवढी परीक्षा? चूक विचार आणि बरोबर विचार, दिशाहीन विचार आणि योग्य दिशेने जाणारे (?) विचार, समंजस, प्रगल्भ विचार व असमंजस, बालिश विचार …साले एवढे judgements? ठीक आहे, तेही परवडले एक वेळ  पण भावना सुद्धा? त्याही चूक किंवा बरोबर या चौकटीत बसवता येतात? एवढी अशक्य गोष्ट किती सहज करतात लोक… खरच विचार करून पहा . अमुक एका वेळी, अमुक तऱ्हेच्या प्रसंगी, अमुक प्रकार...

सुखाश्रू

हि डॉक्टर भूषण केळकर यांची कविता आहे. कोणत्या पुस्तकात वाचली होती ते आठवत नाही आत्ता.. पण आवडली होती, म्हणून लिहून ठेवलीय. valentine day च्या निमित्ताने जे वातावरण बनत चाललंय, पेपर मधल्या भडक आणि अवास्तव महागड्या जाहिराती, सहज फिरताना कानावरून गेलेले काही संवाद, (तेही 'आश्चर्यकारक' या प्रकारात मोडणारे) आणि एकूणच मला  जी 'विचित्र' वाटते अशी पण जवळपास सर्वांनी मान्य केलेली प्रेम या भावनेची व्याख्या..... या अशा पार्श्वभूमीवर हि कविता share करावीशी वाटली. मला खूप आवडलेली कविता आहे. आणि काही बोलणं जरुरी वाटत नाही. The poem speaks for itself.                                                   सुखाश्रू                                                         डॉ. भूषण केळकर  पहाटेची सूर्योदयाची वेळ नितांत सुंदर...