बदल

गेले काही दिवस मी मुंबईत राहतेय. होस्टेल life नंतर बऱ्याच काळाने एका residential colony  मध्ये आलेय. आणि आश्चर्य म्हणजे एका  बोलक्या, जिवंत कॉलोनी त! जिवंत अशासाठी म्हटलं कारण एकमेकांशी संवाद साधणारे लोक, मिळून मिसळून काही कार्यक्रम करणाऱ्या बायका, (ते सुद्धा त्यातल्या आनंद साठी, दिखावा म्हणून नव्हे!)
संध्याकाळचे ५ वाजले रे वाजले कि  बाहेर लहान मुलांचे खेळ, ९ वाजेपर्यंत न संपणारा दंगा, आणि खेळ संपल्यावर कोणतीही  random बेल वाजवून हक्काने प्यायला पाणी मागणारी मुले - या सगळ्या गोष्टी ज्या मला कुठेतरी हरवून गेल्यासारख्या वाटत  होत्या , त्या इथे 'जिवंत' दिसल्या!
मलाही माझ्या गावाची आठवण आली.. आणि एकदम "पूर्वी माझा  गाव हि  असा  असायचा " असा विचार आला. आणि दुसऱ्याच क्षणी त्यातला "पूर्वी" हा शब्द अक्षरशः  बोचला!  म्हणूनच हे काहीतरी सुचतंय.

आपण मोठे होतो, तसा नव नवीन गोष्टीतला आनंद अनुभवतो. आणि तो आनंद अजून नवीन गोष्टीतला आनंद  discover करायला आपल्याला प्रवृत्त करतो. खरं आहे!
 multiplex मधे  dolby sound  आणि  3d effects  सह फिल्म बघणे,  TV  वरच्या मालिका, गाडीतून छान  long drive,   ice creams, cake, pastries,  क्वचित मित्र मैत्रिणी बरोबर  disc ,  घरातल  home theatre  आणि  आपला स्वतःच झकास  CD/VCD/DVD collection,  आपली  bike  आणि जाळलेल पेट्रोल , आणि श्वासापेक्षा महत्वाचे बनलेले  sms , facebook!!  यातली मजा मीही अनुभवलीय. ती सर्वांनी घ्यावीच ! आणि आपल्यातल्या ज्यांनी कुणी अनुभवलीय, त्यांना त्याची  limitations  माहिती आहेत . म्हणूनच काही गोष्टींचा खूप राग येतो.

आमच्या गावात आता मुली खेळतानाच दिसत नाहीत... त्या tv serials  बघतात. पूर्वी म्हणे दिवाळीत पोहे खायला प्रत्येक घरात ३-४ पंगती उठायच्या. आता चक्क १च घरात पोहे खायला आम्ही जातो. चतुर्थी च्या दिवसात आरत्या, ५हि दिवस घरात लोकांची ये-जा हे माझ्या बालपणात व्हायचं. आणि आता फक्त विसर्जनाच्या दिवशी एकत्र येऊन 'आपली भेटच कशी होत नाही' यावर सगळे गप्पा करतात..
ऋषि पंचमी च्या दिवशी 'कंदमूळ ' करायचा भल मोठ्ठं पातेलं गेल्या कितीतरी वर्षात माळ्यावरून खालीच आलेलं नाहीय! का? कारण "पूर्वीसारखे" आता लोक येत नाहीत. अरे मग आता लोक करतात तरी काय? तर म्हणे सगळे आपापल्या कामात busy  झालेत!

सर्वांनी आपापल्या कामात  busy  होऊ नये असं नाही , गावातल्या लोकांनी टीव्ही बघू नये असं हि नाही! मी इथे मांडलंय फक्त एक दृश्य .. एक  comparison  चा प्रयत्न , आणि एक राग!

राग नेमका कसला ते खरंतर मलाही माहित नाही . कदाचित हि  reaction  आहे. कोणताही बदल झाला, कि त्याला होणारा स्वाभाविक विरोध! कदाचित काहीतरी हरवल्याच दुःख होतं... काय माहित!!!

Comments

  1. tyat thodasa mazahi rag "add" kar...

    ReplyDelete
  2. nakki !
    ani anyways, there r few things we can we can really do abt it apart frm expressing our anger!

    ReplyDelete
  3. आता कृपा करून काही फोडू नोकोस म्हणजे झालं..!! जाता जाता तुला आभार 4 ur comment on my blog...आणि 4 निमंत्रण...!! तू आधी भ्रमणध्वनी घे पाहू .....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Kargil war memorial : an experience

RESOLUTION

Of Charms and Chinars