Posts

Showing posts from May, 2014

खिडकी

Image
असच घर हव होता मला.. पाऊस बघणारं. पूर्वी कसं, फ्लेट मध्ये राहिल्यामुळे केवढाहि मोठा पाऊस असला तरी फक्त चौकोनी खिडकी एवढा दिसायचा. विजा, ढग, वेड्यासारखा वारा आणि त्याहून वेडा पाऊस. पण तो दिसायचा फक्त ६ बाय ३ फुटाच्या चौकटीतून समोरच्या निर्जीव इमारती नंतर उरलेल्या अवकाशात. पण आता नाही. हे छान आहे. दिवाणखान्याच्या फ्रेंच विंडो समोर मोकळी बाग आहे, आणि त्या पुढे  निळ्या डोंगरांच्या रांगा. छान दिसेल पाऊस इथून. पण अवकाश आहे अजून. आधी हे मे महिन्याचं उन रणरणतय ते सरुदेत. घामाच्या धारा लागतायत नुसत्या. बेचैन होतो जीव. काही सुधरतच नाही. पण समोरच्या मोठ्या खिडकीतून गुलमोहर डोकावतो तेव्हा छान वाटतं. तेवढाच विसावा. आज संध्याकाळ पासून मळभ दाटून आलंय. अवेळीच पाऊस येतोय की काय? छे, शक्यता कमीच वाटतेय. फसवे ढग आहेत ते. आणि असे ढग आले की वाराही येत नाही. सगळं स्तब्ध. मोठी खिडकी  एखाद्या मोठ्या चित्राच्या फ्रेम सारखी दिसतेय. काळे निळे ढग, काळे डोंगर, काळेच माड . तिन्हीसांजा असल्यामुळे गुलमोहर सुद्धा काळसर. मोनोक्रोम मधलं मोठ्ठ चित्र! वाटतं, असाच यावा पाऊस अनपेक्षितपणे... चित्र अस्ताव्य...