Posts

Showing posts from August, 2012

"वास पुराण"

Image
दर सोमवारी वाळपई ते पणजी असा दोन तासांचा बस प्रवास होतो. हा प्रवास म्हणजे a complete assault on senses असतो. त्यातल्या त्यात नाकावर जास्त! for those who are ‘blessed’ with a sharp sense of smell, the journey is enough to turn it into a curse. घरूनच सुरुवात होते. सकाळी ६:३० – ६:४५ च्या दरम्यान निघाल्यामुळे स्वच्छ ताजा श्वास आणि भोवतीच्या झाडांमुळे मोकळा वास पुढच्या आठवड्या साठी साठवून मी बस साठी उभी राहते. बस मध्ये चढतानाच पहिला हमला होतो- गंजलेल्या स्टीलचा वास... आणि त्या handle ला धरून चढण्या शिवाय पर्याय नसल्यामुळे तो वास पुढे २ तास हाताला चिकटून राहतो! आत शिरल्यावर बस मधल्या अगरबत्ती चा वास! (बस मध्ये अगरबत्ती लावायची प्रथा ज्याने कुणी सुरु केली असेल त्याला देव माझ्या शापा पासून वाचवो) खेडेगावातील शाळेत जाणारी मुलं खच्चून भरलेली असल्यामुळे त्यांनी डोक्याला   लावलेल्या तेलाचा वास. त्यात सुद्धा खोबरेल चा वेगळा आणि कुठल्या तरी ‘सुगंधी’ तेलाचा – पण दोन्ही स्वतः पुरते prominent! आणि सोमवार असल्यामुळे ‘स्वच्छ ‘ धुतलेल्या uniform ला येणारा detergent चा वास... असे वार (कि वास?) ...