वाट कठीण वळणांची असली
तरीही मन चालत राहत,
आठवणीत जातं , कधी मागे वळून पहात
शोध आडोशाचा नसतो,
पाहिजे असतो दिलासा
गर्द छायेचीच अपेक्षा नाही,
गार वारा हि असे पुरेसा.
अशाही वेळी कधीतरी
असं वळण वाट घेते,
वारा व सावलीच काय
प्रेमाची खाण समोर येते!
न सांगता, न मागता
खूप काही मिळून जातं
वाटेवरच्या समाधानात
थकलेलं मन मनसोक्त न्हात.
चिंब मनाला एवढ्यात
पुढल्या वाटेचं भान येतं,
वाट कठीण वळणांची दिसते,
तरीही मन चालत रहातं...
तरीही मन चालत राहत,
आठवणीत जातं , कधी मागे वळून पहात
शोध आडोशाचा नसतो,
पाहिजे असतो दिलासा
गर्द छायेचीच अपेक्षा नाही,
गार वारा हि असे पुरेसा.
अशाही वेळी कधीतरी
असं वळण वाट घेते,
वारा व सावलीच काय
प्रेमाची खाण समोर येते!
न सांगता, न मागता
खूप काही मिळून जातं
वाटेवरच्या समाधानात
थकलेलं मन मनसोक्त न्हात.
चिंब मनाला एवढ्यात
पुढल्या वाटेचं भान येतं,
वाट कठीण वळणांची दिसते,
तरीही मन चालत रहातं...
वा..! खुपच छान..! तू केलियेस का .?(हे अस विचरन्याचा पुणेरी चाहटलपना करतोय माफ़ कर? पण विचारल्याशिवाय रहावत नाही. खुप छान कविता आहे..!!
ReplyDeletechan lihili..inspiration/reason kay?kavitech nav kay..
ReplyDeleteDhanyavaad! kavita juni ahe, tyamule prerna athvat nahi, pan lihit rahanyasathi tumche sarvanche comments hi prernach ahe! thank you
ReplyDelete