बदल
गेले काही दिवस मी मुंबईत राहतेय. होस्टेल life नंतर बऱ्याच काळाने एका residential colony मध्ये आलेय. आणि आश्चर्य म्हणजे एका बोलक्या, जिवंत कॉलोनी त! जिवंत अशासाठी म्हटलं कारण एकमेकांशी संवाद साधणारे लोक, मिळून मिसळून काही कार्यक्रम करणाऱ्या बायका, (ते सुद्धा त्यातल्या आनंद साठी, दिखावा म्हणून नव्हे!) संध्याकाळचे ५ वाजले रे वाजले कि बाहेर लहान मुलांचे खेळ, ९ वाजेपर्यंत न संपणारा दंगा, आणि खेळ संपल्यावर कोणतीही random बेल वाजवून हक्काने प्यायला पाणी मागणारी मुले - या सगळ्या गोष्टी ज्या मला कुठेतरी हरवून गेल्यासारख्या वाटत होत्या , त्या इथे 'जिवंत' दिसल्या! मलाही माझ्या गावाची आठवण आली.. आणि एकदम "पूर्वी माझा गाव हि असा असायचा " असा विचार आला. आणि दुसऱ्याच क्षणी त्यातला "पूर्वी" हा शब्द अक्षरशः बोचला! म्हणूनच हे काहीतरी सुचतंय. आपण मोठे होतो, तसा नव नवीन गोष्टीतला आनंद अनुभवतो. आणि तो आनंद अजून नवीन गोष्टीतला आनंद discover करायला आपल्याला प्रवृत्त करतो. खरं आहे! multiplex मधे dolby sound आणि 3d effects सह फिल्म बघणे, TV वरच्या मालिका, गाडी